Home पुणे माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता- रोहित पवार

माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता- रोहित पवार

पुणे : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली. यानंतर विरोधकांकडून वारंवार त्यांच्या राजीनामा मागितला जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले हा व्यक्तीगत विषय आहे. पोलीस याबद्दल तपास करत आहेत. पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत काही बोलता येणार नाही. मात्र, हा काही प्रमाणात हा बदनामीचा आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचे पुढे येतय, असं रोहित पवार म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सत्य परिस्थिती मांडलीय, माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता, असंही रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, रोहित पवार यांनी आज बारामती येथील पिंपळी लिमटेक येथे मतदान केलं. त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

इतके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादीत आहेत- निलेश राणे

धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करा- तृप्ती देसाई

भाजपच्या ‘या’ नेत्याचा रेणू शर्मांवर गंभीर आरोप; धनंजय मुंडे प्रकरणाला वेगळ वळण

“धनंजय मुंडे राष्ट्रवादी कार्यालयात दाखल; राजीनामा देण्याची तयारी?”