मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातली आघाडी तुटली. शिवसेना आणि भाजपा यांची युती तुटल्यानंतरच हे घडलं हा अतिशय मोठा योगायोग म्हणावा लागेल. मात्र त्यावेळी जेव्हा हे घडलं तेव्हा आमची आघाडी तुटली नसती तर भाजपाला इतक्या सहज सत्ता स्थापन करता आली नसती, असं वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे
खरंतर मी महाराष्ट्रात येईन असं वाटलं नव्हतं. कारण मी सुरुवातीपासून दिल्लीतच होतो. दिल्लीत असतानाही माझा फारसा संबंध महाराष्ट्राशी आला नाही. महाराष्ट्रात आलो तेव्हा मला प्रशासन कसं चालतं ते ठाऊक होतं. मात्र इथे सत्ता चालवणं, सगळ्या कार्यकर्त्यांना समजून घेणं यामध्ये वर्षभराचा कालावधी गेला. कोणत्याही मोठ्या चुका झाल्या नाहीत असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
आमच्या आमदारांची संख्या कमी आहे. आमच्या वाट्याला आलेली मंत्रिपदं कमी आहेत. पण सरकार समन्वयाने चाललं आहे. प्रत्येक पक्षाला वाटत असतं की आमचं जास्त ऐकलं पाहिजे. मात्र सध्याचं सरकार समन्वयाने सुरु आहे, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
रुग्णांना तुमची गरज आहे, ओपीडी सुरु करा; सुप्रिया सुळेंचे डॉक्टरांना आवाहन
…मग आम्हाला कसला इतिहास शिकवताय?; आशिष शेलारांच शिवसेनेवर टीकास्त्र
…तर लोकांना ही माहिती मिळणं सोपं जाईल; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
उद्या हे महाराष्ट्राच्या जडणघडणीत छत्रपती शिवरायांचे योगदान काय असंही विचारु शकतात; शिवसेनेची टीका