Home महाराष्ट्र 3 मे नंतर मशिदींवरचे भोंगे उतरले नाहीत तर…; औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंची...

3 मे नंतर मशिदींवरचे भोंगे उतरले नाहीत तर…; औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंची मोठी घोषणा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

ईद (3 मे) नंतर मशिदींवरचे भोंगे उतरले नाही तर 4 मे पासून बिना परवानगीचे भोंगे असलेल्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालिसा पठण झालेच पाहिजे, अशी राज यांनी या सभेत घोषणा केली. तसेच उत्तर प्रदेशात मशीदवरचे बिना परवाना भोंगे उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही, असा सवालही राज यांनी यावेळी उपस्थित केला.

हे ही वाचा : “शिवसेनेची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

दरम्यान, भोंगे हा धार्मिक विषय नाही, सामाजिक विषय आहे. सर्वांनाच याचा त्रास होतो. हा वाद खूप जुना आहे आणि तो निकाली निघालाच पाहिजे. मंदिरांवरचेही बिना परवाना भोंगे उतरले पाहिजेत पण, आधी मशिदींवरचे उतरतील आणि नंतर मंदिरांवरचे, असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

कुणी कितीही भगव्या शाली पांघरल्या, तरी…; संजय राऊतांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण!

मोठी बातमी! राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची गुणवत्ता यादी जाहीर; प्रमोद चौगुले, रुपाली माने राज्यत प्रथम