अमित भाईंच्या पायगुणानं महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल- चंद्रकांत पाटील

0
353

पुणे : गृहमंत्री अमित शहांच्या पायगुणाने मविआ सरकार जावं, असं भाजप नेते नारायण राणे म्हणाले होते. त्यावर शिवसेनेने सामना अग्रलेखातून अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? असा सवाल उपस्थित केला होता. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमित भाईंच्या पायगुणानं वैभववाडीतील 6 नगरसेवक गेले त्याचा काही संबंध नाही. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल. मी काही भविष्यकार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, अमित भाई असं व्यक्तीमत्व आहे, भाजप हा पक्ष असा आहे जो कुणाला घाबरत नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही, जे बोलायचं ते छातीठोकपणे बोलतो. समोरच्याला टाकून बोलणं, लागून बोलणं अशी आमची संस्कृती नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी

“मुंबईत भाजपला मोठा धक्का! राम कदमांच्या समर्थकांचा मनसेत प्रवेश”

“सलग 3 दिवस बॅंका राहणार बंद; पहा कधी ते”

मी या पृथ्वीतलावरची सर्वात चांगली अभिनेत्री- कंगणा रणाैत

निवडणुकीत पवार साहेबांनी कुस्ती काय असते हे दाखवून दिलं; राष्ट्रवादीचं सदाभाऊ खोतांना प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here