आकोला : राज्य सरकारने 31 जुलैनंतर लॉकडाउन वाढवला तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम असून आता लॉकडाउन मोडावा लागेल. 31 जुलैनंतर राज्यात लॉकडाउन वाढवला जाऊ नये अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन विरोध करु, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सरकारने गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवू नये. माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी आहे”. लोकांना लॉकडाउनमुळे होत असलेल्या मानसिक त्रासाची जाणीव झाली आहे. सरकारने लोकांच्या वागणुकीवरुन परिस्थिती समजून घ्यावी, असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
भाजपनं खरंच स्वबळावर लढून पाहावं; बाळासाहेब थोरातांचे फडणवीसांना आव्हान
“मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन?, आपलं जे मूळ असतं तिथून आपण दूर जात नाही”
चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला राजेश टोपेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…
उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची धमक नाही- रामदास आठवले