Home महाराष्ट्र जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजपची – शरद पवार

जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजपची – शरद पवार

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा 73 वा दिवस आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

आत्तापर्यंत शेतकरी शांततेने आंदोलन करत आहेत मात्र शांततेने आंदोलन करत असलेले शेतकरी जर हिंसक झाले तर सर्व जबाबदारी भाजपची असेल, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आज ज्यांच्या हाती सत्ता आहे ते संवेदनशील नाहीत. विरोधी पक्षांच्या खासदारांना गाजीपूर सीमेवरील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंचादेखील समावेश असल्याचं पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

आपण बेसावध न राहता सावधगिरी बाळगण्याची गरज- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“तात्या विंचूला जीवनदान देणारे ‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड”

“आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने कारभार करतोय, विरोधकांनी लावालावी करू नये”

अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली- निलेश राणे