आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोरोना पसरण्यास काँग्रेस कारणीभूत असल्याचं संसदेत म्हटलं होतं. तसेच कोरोनाच्या संकटात काँग्रेसने मुंबईतील यूपी, बिहारींना त्यांच्या गावाला जाण्यासाठी पैसे दिले. गावाला जा आणि कोरोना पसरवा, असं काँग्रेसचे लोक म्हणत होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केला होता. यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून मोदींचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आज राज्यभरात निदर्शने करणार आहे. याआधी भाजप नेते अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
काँग्रेसचं काळं कुत्र जरी भाजप कार्यालयावर आलं, तर झोडून काढू, असं अनिल बोंडे यांनी या क्लिपमध्ये म्हटलं आहे. एका व्यक्तीशी फोनवर बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हे ही वाचा : “रायगडमध्ये शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार; सरपंच, उपसरपंचासह सदस्यांनी हाती बांधलं शिवबंधन”
ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हणाले अनिल बोंडे ऐका :
आज नाना पटोले यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात सगळ्या भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार…भाजपने माफी मागावी म्हणून! खरे तर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची या काँग्रेसवाल्यांनीच माफी मागायला पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रमध्ये कोरोनाच्या काळात ते कोणाच्याच कामाला आले नाही, मुख्यमंत्री आले नाही, नाना पटोले फिरकले नाही. लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि म्हणून गमजा करत असेल आणि उद्या काँग्रेसचे काळे कुत्रे जरी भाजपच्या कार्यालयावर आले तर त्याला झोडल्या शिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाही., असं अनिल बोंडे यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, अनिल बोंडेंच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या घडामोडी –
लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून भाजपाचे छुपे राजकारण; किशोरी पेडणेकरांची टीका
अजित पवारांनी आयुष्यभर जमिनी लाटण्याचं काम केलं; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
“महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही”