धुळे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला. या भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच, वित्तहानी देखील झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तब्बल 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे, यावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. ते धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
काही दिवसांपूर्वी राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा तडाखा बसला होता. त्या भागांतील काही लोक दरड कोसळल्याने दगावले तर काही लोक अतिवृष्टीमुळे दगावले. यासाठी राज्य सरकारने पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर केले. पण हे पॅकेज वर्तमानपत्रातील प्रसिद्धीची बातमी आहे, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांसाठी पॅकेज घोषित केले तर खरं… मात्र, पॅकेज घोषित केल्याने मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द फिरवला. दिलेला शब्द पाळून त्यांनी पूरग्रस्तांना योग्य ती मदत करावी, असंही आशिष शेलारांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी –
‘फटे लेकीन हटे नही’, सोनियासेनेच्या प्रवक्त्यांना बीफचंही समर्थन करावं लागतंय- चित्रा वाघ
लग्नानंतरही त्याचे अनेक महिलांशी शारीरिक संबंध होते; यो यो हनी सिंगच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा
“ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचे उद्योग बंद करावेत”
राज्यात जर पोलीसच संरक्षण देणार नसतील, तर…; मलंगगड प्रकरणावरून चित्रा वाघ पोलिसांवर संतापल्या