हे तर……महा गा य ब सरकार! चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर टीका

0
429

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

हे तर……महा गा य ब सरकार मंत्रालयातून मुख्यमंत्री गायब पूजा प्रकरणातील मंत्री गायब राज्यातून दोन्ही गृहराज्यमंत्री गायब प्रत्यक्ष घटना बघणारे दोन्ही साक्षीदार गायब विकास कमी भकास जास्त कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असं म्हणत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी याआधी ट्विट करून मंत्री संजय राठोड यांचं नाव उघडपणे घेतलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांना धमकीचे फोन आल्याचा प्रकार घडला. यानंतरही चित्रा वाघ यांनी पुन्हा ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी 

राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा; निलेश राणेंचा हल्लाबोल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

…पण जयंतरावांच्या बाॅसला हे अजूनही जमत नाही; राम कदमांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोठा निर्णय घेणार- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here