मुंबई : शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात राष्ट्रवादीसोबत युती करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युतीचा पुनरूच्चार केला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल, असा दावा संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी हा दावा केला.
हल्ली राजकीय पक्षांना स्वबळाचं अजीर्ण नक्कीच झालं आहे. भाजप म्हणते आम्ही स्वबळावर लढू. भाजप एकटाच आहे. त्यामुळे स्वागत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. सरकारमध्ये राहणार पण स्वबळावर लढणार, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. मग राहिले कोण? तर शिवसेना आणि राष्ट्रवादी. हे दोन्ही पक्ष राज्यातील प्रमुख आणि मोठे पक्ष आहेत. आम्ही दोघांनीही स्वबळाची भाषा केली नाही. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल, असं संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेला महाराष्ट्रातून संपविल्याशिवाय राहणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे
“राडा करणाऱ्यांना काल शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता शिवभोजन देण्याची वेळ आणू नका”
“एकटा संभाजी काय करणार?; त्याच्या मागे 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी”
भाजप कार्यकर्त्यावर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू; निलेश राणेंचा इशारा