मुंबई : शिवसेना भवनाच्या समोर भाजपने केलेल्या आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला उत्तर देऊ म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
आपले राज्य आहे म्हणून शिवसेना कार्यकर्ते राडे करतील, तर त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात त्यांचे सरकार असल्याने शांतता राखण्याची जबाबदारी शिवसेनेची असल्याची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली आहे. आता हा विषय संपायला हवा असे आम्हालाही वाटते. तरीही शिवसैनिकांना असाच संघर्ष चालू ठेवायचा असेल तर भाजपाचे कार्यकर्ते सक्षम आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, महानगरपालिकांची वॉर्ड रचना करताना शहराच्या विकासाचा विचार करायला हवा. राज्य सरकारने कोणतीही रचना आगामी निवडणुकीत आणली तरी भारतीय जनता पार्टीला फरक पडत नाही. भाजपची संघटनात्मक रचना बळकट आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजप आंदोलन करायला आजही घाबरली नाही, उद्याही घाबरणार नाही”
“…अन्यथा आपला पुरूषार्थ फक्त एकट्या महिलेला मारहाण करण्यापुरताच आहे हे कबूल करावं”
अजित पवारांच्या बैठकीदरम्यान तरुणाची मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी, पोलिसांनी घेतलं ताब्यात
…तर राज्यात निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडेंचा सरकारला इशारा