जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शेताच्या बांधावर गेल्याने विरोधकांकडून टीका होत आहे. यावर शिवसेना नेते आणि सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आज अखिल भारतीय वारकरी मंडळाने खान्देश विभागस्तरीय विचारविनिमय व पदनियुक्ती सोहळा गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पार पडला. यात ते बोलत होते.
शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. केंद्रीय कृषिमंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. आज त्यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार हे शेतकऱ्यांच्या भरवश्यावर निवडून येतात. पवार हे शेतकरी कुटुंबातूनच आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी ते शेतीच्या बांधावर जाणार नाहीत तर मग काय बंगल्यात बसून राहतील का?, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय- देवेंद्र फडणवीस
‘हे शेतकऱ्यांचं सरकार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही’; मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही
खडसेंची भाजपने दखल घेतली नाही, पण…; खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चेवर शरद पवारांची प्रतिक्रिया