आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जालना : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
शरद पवार आमच्या सोबत आले असते तर ते या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, आताही शरद पवारांचं स्वागतच आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
ही बातमी पण वाचा : फरहान अख्तरकडून माझी बदनामी, मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा; अभिनेत्री तृप्ती बर्डेची मागणी
दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते, आजही एकत्र आहेत. अजित पवारांचं म्हणणं एकच होतं, जर तुम्हाला शिवसेना चालते तर बीजेपी का चालत नाही?, शरद पवार साहेबांसारखा माणूस आमच्या सोबत आला असता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केलं असतं. शरद पवार हे देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. अजूनही ती वेळ गेलेली नाही, शरद पवार आणि अजित पवार हे जर एकत्र येऊन त्यांचा एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार यांचं स्वागतच आहे, असं आठवले यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या –
श्यामची आई चित्रपटातील ‘श्याम’ हरपला ; अभिनेते माधव वझे यांचं निधन
रणजित बोत्रे यांची सीना स्टार जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतानं घेतले पाच सर्वात मोठे निर्णय