औरंगाबाद : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराचे आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय.
धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याची हमी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देत असतील तरच आंदोलन करण्यात अर्थ आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. मंगळवारी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलकांना वेठीस धरलं तसं पवार आम्हाला वेठीस धरतील तर मग पवार आणि मोदी यांच्यात फरक काय राहिला?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी-
राज्य सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत- देवेंद्र फडणवीस
‘हे’ तर राज्य सरकारचं तुघलकी फर्मान; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची टीका
ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन; अतुल भातखळकरांचा टोला
“दाक्षिणात्य तेलगु अभिनेत्री दक्षी गुट्टीकोंडाच्या हाॅट फोटोंनी सोशल मिडियावर लावलीय आग”