मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकल्यानंतर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी चौकशीला कोणीही घाबरत नाही, घाबरण्याचं कारणच नाही. आता तुम्ही चौकशांना घाबरायला पाहिजे., असं म्हटलं होतं. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणतात आमच्याही चौकशा करु, त्यांनी जरुर चौकशी करावी. जे सत्य असेल ते बाहेर येईल, असं म्हणत रामदास आठवलेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे चांगले उद्योजक आहेत. त्यांनी जर काही केलं नसेल, तर त्यांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांनी शासकीय यंत्रणांना तपास करु द्यावा., असं आठवले म्हणाले.
दरम्यान, या यंत्रणा कोणाच्याही विरोधात नाहीत. राज्यातील सरकार पाडण्यासाठी आम्ही या यंत्रणांचा वापर करत नाहीये, असंही आठवले यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“भाजपचा उमेदवार पराभूत करणे म्हणजे माझे नाक कापले जाईल असं विरोधकांना वाटतं”
सोनाक्षी सिन्हा मालदीवच्या बीचवर; हाॅट अदांनी फॅन्स क्लीन बोल्ड
“फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा, मग सगळे कराचीकर घरंदारं सोडून पळून जातील”