शिर्डी : देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने सरकारने कर्जाने ताब्यात घ्यावे, असा सल्ला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला होता. यावर शिर्डी संस्थानने सकारात्मकता दर्शवली आहे.
कोरोनाच्या संकट काळात जर साईबाबा देवस्थानाचं सोनं जर देशाच्या उपयोगी येत असेल तर आम्हाला आणि साई भक्तांना त्याचा आनंद होईल, असं साईबाबा संस्थानाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी म्हटलं आहे. टाईम्स नाऊला त्यांनी प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
दरम्यान, केंद्र सरकारने आमच्या सूचनेचा विचार करावा त्याचबरोबर एखादी स्किम देऊन देवस्थानाला योग्य तो मोबदला मिळेल, याची काळजी घ्यावी, असंही डॉ. हावरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…तर काय भलं होणार आपलं; निलेश राणेची राज्य सरकारवर टीका
उद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार; किरीट सोमय्यांच मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र
संजय राऊत यांच्या मागणीला आदित्य ठाकरेंचा विरोध; म्हणाले…
एकनाथ खडसे यांना बाजूला सारण्याची हिम्मत राज्यातील भाजप नेत्यांमध्ये नाही- पृथ्वीराज चव्हाण