Home पुणे रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंग चुकीचं होतं तर सरकार इतके दिवस गप्प...

रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंग चुकीचं होतं तर सरकार इतके दिवस गप्प का होतं?- चंद्रकांत पाटील

पुणे : “आयपीएस अधिकारी आणि तत्कालीन गुप्तवार्ता आयुक्त रश्मी शुक्ला  यांनी राज्य सरकारची परवानगी घेऊनच बदल्यांच्या व्यवहारांविषयी फोन टॅपिंग केले होते, अशी माहिती आहे. पण त्यांनी केलेले फोन टॅपिंग चुकीचे होते तर इतके दिवस राज्य सरकार काय करत होतं?,असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आल्यानंतरच हे टॅपिंग चुकीचे का वाटू लागले?,  पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगच्या आधारे बदल्यांमधील भ्रष्टाचाराचा अहवाल जून-जुलैच्या दरम्यान तत्कालीन पोलीस महासंचालकांकडे दिला होता. त्यांनी तो तत्कालीन गृह सचिवपदी असलेल्या अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिला होता, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, फोन टॅपिंग चुकीचे केले गेले तर गेले काही महिने राज्य सरकारने त्याबाबत काय केले? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीस नव्हे, आघाडी सरकारच अस्वस्थ झालंय- प्रवीण दरेकर

जीममध्ये अति वजन मारताय मग सावधान! बेंच प्रेस मारताना बॉडी बिल्डरच्या फाटल्या मांसपेशी, पहा व्हिडीओ

भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार व्हायचे का?; रोहित पवारांचा प्रश्न

देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरे सरकारचं कौतूक; म्हणाले…