Home नाशिक राज ठाकरेंनी जर परप्रांतीय विरोधातील भूमिका बदलली तर…- चंद्रकांत पाटील

राज ठाकरेंनी जर परप्रांतीय विरोधातील भूमिका बदलली तर…- चंद्रकांत पाटील

नाशिक :  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज भेट झाली. त्यांच्या या भेटीनंतर राज्यात अनेक चर्चांना उधाण आलंय. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये नाशिक विश्रामगृहाच्या बाहेर तब्बल 15 मिनिटे चर्चा झाली.

राज ठाकरे यांच्यासोबत माझी केवळ सदिच्छा भेट झाली असून, आमच्याच कोणत्याही प्रकारच्या युतीबद्दल चर्चा झाली नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यात आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या या भेटीचा खुलासा केला आहे.

भाजप आणि मनसेची युती होणार का?, असा सवाल चंद्रकांत पाटलांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राज ठाकरे हा आश्वासक चेहरा आहे. जर त्यांनी परप्रांतीय विरोधातील भूमिका बदलली तर नक्कीच स्वागत करु आणि तरच आम्ही सोबत येऊ शकतो, असं चंद्रकांत पाटल म्हणाले आहेत.

मनसे सोबत युती ही चर्चा असून निर्णय मात्र पक्ष मंथन करून घेतो. सध्या तरी कोणालाही सोबत घेण्याचा विचार नाही. आम्ही मुसलमान विरोधी नाही. परंतू त्यांचं लांगुलचालन करत नाही. रयत, जानकर, आरपीआय सोबत आहेतच, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मला सांगितलं की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्याची लिंकही ते मला पाठवणार आहेत. आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

काँग्रेसमुळे सत्तेत आहात विसरु नका; शिवसेना-राष्ट्रवादीच्या वादात काँग्रेसची उडी

“2024 ची वाट पहावी लागणार नाही, मोदी सरकार लवकरच कोसळणार”

“योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईन”

“…मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत?”; शिवसेनेचा सवाल