मुंबई : कल्याणमधील मलंगगड परिसरात टवाळखोर तरुणांनी फिरायला आलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तोकडे कपडे घातल्यावरुन वाद घालत 7-8 जणांनी या चौघांना मारहाण केल्याचा आरोप आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याची तक्रार करण्यासाठी नेवाळे पोलीस स्टेशनला पोहोचलेल्या जोडप्याची पोलिसांनीही दखल घेतली नाही. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मलंगगडमध्ये काही तरुण-तरुणींना मारहाण झाल्याची बातमी पाहिली. त्यांचा पेहराव हे मारहाणीचं कारण सांगितलं जात आहे. हे काय कपडे घातले आणि कसे घातले? असं स्थानिक मंडळींचं म्हणणं होतं. त्यावरुन वाद झाला आणि मुलं-मुली दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. ते त्याच परिस्थितीत नेवाळे पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनीही दखल घेतली नाही, हे तर अतिशय गंभीर आहे., असं चित्रा वाघ म्हणाल्या.
दरम्यान, ज्यांनी मारहाण केली त्या समाजकंटकांवर तर कारवाई व्हायलाच हवी, पण ज्यांनी त्याची दखल घेतली नाही, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई का होऊ नये? कारण ज्यावेळी मुलं-मुली तुमच्याकडे आली, त्यावेळी त्यांच्या हाता-पायाला लागलं होतं. पाठीवर वळ होते. काचेने कापलं होतं. अशी गंभीर परिस्थिती असताना त्यांना दिलासा देणं, तात्काळ गुन्हा नोंद करुन घेणं गरजेचं होतं. राज्यात जर पोलीस संरक्षण देणार नसतील, तर प्रत्येकाने आपल्या हाती शस्त्र बाळगण्याची वेळ आलेली आहे, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या घडामोडी –
“ऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत आणखी एक पदक, बाॅक्सर लवलीनानं कांस्यपदकावर कोरलं नाव”
“अमित शहा संसदेत आले आणि निवेदन दिलं, तर मी टक्कल करेन आणि तुमच्या कार्यक्रमात येईन”
वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण…; प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा