“गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे परत आणू; भाजप खासदाराच्या विधानाने खळबळ”

0
351

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.

हे ही वाचा : विश्वास नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त करा; किरीट सोमय्या यांची आक्रमक मागणी

शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं म्हणत शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. मोदींच्या या निर्णयानंतर काही जण मात्र हे कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी करत आहेत. अशातच राजस्थानच्या राज्यपालांनी रद्द केलेल्या कृषी कायद्यासंदर्भात एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते. तसेच गरज पडल्यास हे कायदे पुन्हा आणले जातील. शेतकरी संघटनांनाही अशी शंका आहे आणि म्हणून जोपर्यंत संसद या कायद्यांना मागे घेतल्याचं अधिकृतपणे सांगत नाही, तोवर शेतकरी आंदोलन संपणार नाही, असं वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेना-राष्ट्रवादीकडून राणे समर्थकांचा करेक्ट कार्यक्रम; रत्नागिरी जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचं वर्चस्व”

“बिग बाॅस फेम सुरेखा कुडचीसह अनेक कलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश; सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत होणार प्रवेश”

‘या’ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी-भाजप एकत्र; राजकीय चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here