Home नाशिक जर महाराष्ट्रातले मॉल्स उघडले जाऊ शकतात तर मग मंदिरं का नाही?; राज...

जर महाराष्ट्रातले मॉल्स उघडले जाऊ शकतात तर मग मंदिरं का नाही?; राज ठाकरेंचा सवाल

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचं एक शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला आलं होतं. त्यांनी महाराष्ट्रातली मंदिरं सुरु करण्याबाबत राज ठाकरेंकडे निवेदन दिलं. त्यावेळी राज ठाकरेंनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

जर महाराष्ट्रातले मॉल्स उघडले जाऊ शकतात तर मग मंदिरं का नाही? योग्य ती खबरदारी घेऊन मंदिरं उघडली गेली पाहिजेत अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील मंदिरं हे लॉकडाउन जाहीर झाल्यापासून बंद आहेत. म्हणजेच मार्च महिन्यापासून ही मंदिरं बंद आहेत. कोणतीही गर्दीही होऊ नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय सरकारने घेतला. मात्र आता ऑगस्ट महिना उजाडला आहे. अशात हळूहळू अनलॉकच्या दिशेने आपण जातो आहोत. असं सगळं असताना मंदिरं उघडण्यास काय हरकत आहे? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी एकूण 5 जणांना कोरोनाची लागण

“आदित्य ठाकरे हे एक सक्षम नेता, त्यांच्यात काम करण्याची जिद्द”

मुंबई शहर नाही सांभाळता येत आणि वार्ता देशाच्या; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

मंदिरं आणि धार्मिक स्थळं सुरू व्हावी, कारण…; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य