मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. मुंबई विमानतळावरुन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करुन ही यात्रा शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाली. नारायण राणे यांनी यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं.
आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीही माझ्या डोक्यावर हात ठेवून अशीच प्रगती कर असं म्हटलं असतं, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना स्मृतीस्थळावर जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला होता. मात्र राणेंनी आज नितेश राणे, प्रवीण दरेकर यांच्यासह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन केलं.
महत्वाच्या घडामोडी –
आता उद्धवचा काळ संपला, महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार- नारायण राणे
मुस्लिम धर्मात अधिकृत बायका तर हिंदू धर्मात…; रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य
“आदित्य ठाकरेंना भेटलेला पुण्यातील अफगाण विद्यार्थी संकटात, तालिबानकडून कुटूंबाचा शोध सुरू”