Home नागपूर “मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता”

“मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता”

नागपूर : कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दिल्लीमध्ये गेल्या 26 दिवसांपासून आंदोलन केलं आहे. या आंदोलनाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही पाठींबा दर्शविला आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

मंत्रिमंडळातील नेतेमंडळींना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. एकतर मंत्री राहा नाहीतर आंदोलन करत रहा. मात्र मी जर मुख्यमंत्री असतो तर राजीनामा घेतला असता, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील का कायदा करत नाही?, असा सवालही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी केला.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपला टीकेबद्दल ‘भारतरत्न’ द्यायला हवा; संजय राऊतांचा टोला

“अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाची लागण”

“…अशा देशात आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही”

मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांचा छापा; सुरेश रैना, सुझेन खानसह 34 जणांवर गुन्हा दाखल