रायगड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलताना पुन्हा एकदा भाषा घसरली.
राणे जनआशीर्वाद यात्रेसाठी कोकण दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राणे महाडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं.
‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणाव. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?, असा घणाघात राणेंनी यावेळी मुख्यमंत्र्यांवर केला.
महत्वाच्या घडामोडी –
कोरोना काळात खचून न जाता राजेश टोपेंनी आपली भूमिका सार्थपणे निभावली- सुप्रिया सुळे
“लाचखोरी प्रकरणातील शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचं अखेर निलंबन”
“सत्तेच्या लालसेपोटी ठाकरे सरकारला हिंदू सणांचाही विसर”
महाविकास आघाडी सरकार भूईसपाट होईल ; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य