“मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते”

0
182

बुलढाणा : मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय गायकवाड यांनी केलं. ते बुलढाण्यात बोलत होते.

केंद्रातील भाजपने राज्य सरकारला मदत करायचं सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटलं. तर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये, असं संजय गायकवाड म्हणाले.

तुम्ही हे वाचलात का?

“रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतले यात पोलिसांचा काय दोष?”

जर का माणसंच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारत आहात. त्याशिवाय तुम्ही तर सरकार पाडायला निघाले आहात. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा, असं आवाहन संजय गायकवाड यांनी भाजपला केलं.

दरम्यान, संपूर्ण देशभर कोरोनामुळं हाहाकार उडाला आहे. मात्र विरोधी पक्ष यावेळी मदत करायचं सोडून राजकारण करत आहे, असा आरोप संजय गायकवाड यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

हैदराबादच्या पराभवाची हॅट्रिक; मुंबई इंडियन्सचा 13 धावांनी विजय

गडकरी-फडणवीस यांनी हवेत कोविड हॉस्पिटल बांधली का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल

आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या; प्रवीण दरेकरांचं नवाब मलिकांना आव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here