Home महाराष्ट्र मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते; पंकजा मुंडेंचा भाजपवर...

मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते; पंकजा मुंडेंचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनामे दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी वरळीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही खडतर होता. पुढेही खडतर आहे. मी आज निवडणुकीत पडले असले तरी संपले नाही. मी संपले असते तर मला संपवण्याचे प्रयत्नही संपले असते, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय.

दरम्यान, योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते माझ्या भावांनो. अविचाराने कोणताही निर्णय का घ्यायचा? आपण सात्विक माणसं आहोत. 90 टक्के वारकरी आहोत. माझा पराभव झाला. कुणाचा पराभव झाला नाही? महाराष्ट्रात अनेकाचा पराभव झाला. मी त्याने हरले नाही, असं पंकजा मुंडे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“अशांना मंत्री केल्याने शिवसेनेला फरक पडत नाही”

“शरद पवारांच्या भेटीनंतर आता निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट राहुल गांधी, प्रियांका गांधींच्या भेटीला”

माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा; पंकजा मुंडेंचा फडणवीसांवर निशाणा?

नाना पटोलेंची अवस्था रोज मरे, त्याला कोण रडे अशी झालीये- प्रवीण दरेकर