मी दोन वर्षांपूर्वी भाजपा प्रवेशाची ऑफर स्वीकारली असती तर…; राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

0
338

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मी दोन वर्षांपूर्वी भाजपा प्रवेशाची ऑफर स्वीकारली असती तर महाविकास आघाडी सरकार दोन वर्षांपूर्वीच कोसळलं असतं असा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.

दोन वर्षांपूर्वी माझ्याकडे काही प्रस्ताव आले होते. मी जर समझौता केला असता तर माझ्यावर कारवाई झाली नसती. पण दोन वर्षांपूर्वीच महाविकास आघाडी सरकार कोसळलं असतं, असं अनिल देशमुख म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

ही बातमी पण वाचा : मुंबई महापालिका स्वबळावर लढणार का? नाना पटोेलेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मी सगळा त्रास सहन केला. मी कुठल्याही पद्धतीने कुणावर खोटे आरोप करणार नाही. मी कुठलीही तडजोड करायला नकार दिला. त्यामुळे मला सगळं भोगावं लागलं असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“मी, तुम्हांला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, महाविकास आघाडीची एकजूट कायम राहणार”

 उद्धव ठाकरेंबद्दल, बोलताना राज ठाकरे भावूक, म्हणाले, आमच्या नात्यात कोणीतरी…

‘या’ कारणामुळे वर्ध्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बिनसलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here