Home पुणे मी रणांगणात उतरलो तर महागात पडेल; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

मी रणांगणात उतरलो तर महागात पडेल; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

पुणे : मी रणांगणात उतरलो तर महागात पडेल असं म्हणत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केलेल्या टिकेला प्रत्यत्तर दिलं आहे.

मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे. मी रणांगणात उतरलो तर महागात पडेल. ते स्वत: काचेच्या घराता राहतात आणि संस्था गायरानावर आहेत. उगाच मला काढायला लावू नका. माझ्यावर टीका करण्याऐवजी त्यांनी आपल्या अमाप साम्राज्याची काळजी करावी, असं चंद्रकांत पाटील म्हणले.

सांगलीत पूर आला तेव्हा आम्ही काय केले हे सर्वांनाच माहिती आहे. पण आज जेव्हा देश आणि राज्य करोनाचा सामना करत आहे तेव्हा भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम सांगलीत काय करत आहेत ? याचं उत्तर त्यांनी द्यांव. जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पालकमंत्री पदावरुन त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड फेकू नयेत. महापूर आला होता तेव्हा भाजपा नेत्यांनी काय मदत केली हे सर्वांनात ठाऊक आहे. चंद्रकांतदादांसारख्या मोठ्या नेत्याने अशी वक्तव्यं करणं चुकीचं आहे, असं म्हणत विश्वजीत कदम यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टिका केली होती.

महत्वाच्या घडामोडी-

जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात आलेल्या 14 जणांना करोना

पंतप्रधानांनी केली मोठी घोषणा; देशात 3 मेपर्यंत लॉकडाउन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करा- अजित पवार

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का?- किरीट सोमय्या