Home महाराष्ट्र मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात भरती करा; देवेंद्र फडणवीसांचा...

मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात भरती करा; देवेंद्र फडणवीसांचा ‘या’ नेत्याला फोन

मुंबई : जर मला कोरोना झाला तर मला मुंबईतील सरकारी रूग्णालयात दाखल करा, असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री गिरीष महाजन यांना फोनवरून सांगितलं आहे.

गिरीश, मला कोविड झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात भरती करा, खासगी रुग्णालयात दाखल करू नका, असं फडणवीस यांनी महाजन यांना फोन करून सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण राज्यात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फिरत असल्याने फडणवीस यांना कोरोना होण्याची भीती वाटत आहे. याकारणामुळे त्यांनी गिरीश महाजन यांना फोन करून ही सूचना केली.

महत्वाच्या घडामोडी-

नया है वह’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले..

निष्णात वकिलांची टीम 27 तारखेलाही असेल; मराठा आरक्षणाची सुनावणी समाधानकारक- अशोक चव्हाण

राजकीय कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमू नका; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी