पुणे : हिंदू समाज जागृत झाला तर गाईंची कत्तल थांबेल, असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. ते शनिवारी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
गाय कापली जाते, ही खरी समस्या नाही. तर गायीला माता मानत असूनही कोणीही गाय पाळायला तयार नाही, हे समस्येचे खरे मूळ आहे. आज देशात केवळ 45 हजार गायी शिल्लक आहेत. मात्र, त्यांना कसे जगवायचे हा प्रश्न उभा ठाकलाय, असं मोहन भागवत म्हणाले.
पाश्चिमात्य जगात गाय उपभोगाची वस्तू मानली जाते. परंतु, गाय ही निसर्ग, माती आणि मनुष्याच्या स्वभावावर परिणाम करत असते. आपण केवळ दुधासाठी गाय पाळत नाही. गाय, गोमूत्र आणि शेण या माध्यमातून सभोवतालचं पावित्र्य राखले जाते. मात्र, सध्या गोसंवर्धनाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यासाठी सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करायला पाहिजेत, असंही भागवत यांनी म्हटलं.
दरम्यान, समाज जागृत झाला तर कोणीही गाय कापायला पाठवणार नाही. आज हिंदूच लोक गाय कापायला पाठवतात. अनेक ठेकेदार हिंदूच आहेत, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कर्करोगामुळे निधन
‘मी पुन्हा येईन’ या वाक्यात मी पणाचा दर्प नव्हता; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार यांना पलटवार
लवकर फाशी होत नसले तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच- अण्णा हजारे
सोनी कंपनीने केला ‘हा’ नवा कॅमेरा लाॅँच