मुंबई : 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आज परिस्थिती आणखी चांगली असती, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपला 22 वा वर्धापन दिन साजरा करत असून यानिमित्ताने ते एबीपी माझाशी बोलत असताना त्यांनी ही खंत व्यक्त केली.
2004 मध्ये राष्ट्रवादीला 72 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळूनही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय आम्ही त्यावेळी घेतला. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती चांगली झाली असती असं आजही वाटतं, असं जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, 2014 च्या आधी 15 वर्षात महाराष्ट्राने जी चौफेर प्रगती केली त्याच आमचा सिंहाचा वाटा होता, असंही जयंत पाटलांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं पाहिजे, वाट लावली मुंबईची”
“वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची”
“मुंबई पाण्याने भरी, मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी ही कोणाची जबाबदारी”
लसीकरणाचा 6 हजार कोटींचा चेक कुठे गेला?; चंद्रकांत पाटलांचा सवाल