रत्नागिरी : आमच्या हाती सूत्र द्या, चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत नाही केलं तर राजकारणातून संन्यास घेईन, असं वक्तव्य विरोधी पक्षनेतेत देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावरुन आता शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.
गेले दोन वर्षे राज्यसरकार कोरोना महामारीचा सामना करत आहे. अशातच देवेंद्र फडणवीस फक्त त्रास देण्याचं काम करत आहेत, असं म्हणत भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
राजकारणात आतापर्यंत पाहिलं आहे की राज्यावर कोणतंही संकट आलं तर सर्वजण पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येतात आणि संकटांचा सामना करतात. मात्र, दोन वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी फक्त त्रास देण्याचा काम केलं आहे.त्यामुळे माझ्या मते त्यानी राजकारणातुन संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच तरी संपले. त्यामुळे फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, असंही भास्कर जाधव म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेचा मोठा निर्णय, सर्व आमदारांना ‘व्हिप’ जारी
“आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते”
पंतप्रधान मोदी आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’ आहेत”
“संजय राऊतांनी 6 आठवड्यांचं अधिवेशन बोलवावं, आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं”