आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
अजित पवारांच्या बंडानतर शिंदे गटाच्या 16 आमदार अपात्र होणार, असा दावा काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. आता या प्रकरणावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : गोप्याला आवर घाला, नाहीतर…; अजित पवारांवरील टीकेनंतर अमोल मिटकरी संतापले
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास पाच ते दहा टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपचे प्लॅन कामी येणार नाही, असंही बच्चू कडू म्हणाले.