मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारीला भारत भेटीवर येत आहेत, याच पार्श्वभुमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मुंबईला आले असते तर त्यांनी पहिली गोष्ट शिवथाळीच्या स्टॉलवर जाण्याची केली असती, असं वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या शिवथाळीची चर्चा आहे. सगळ्या जगाला या 10 रुपयांच्या शिवथाळीचं आश्चर्य वाटत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना राज्यात आणले असते तर त्यांनी आधी शिवथाळी चाखली असती, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
डोनाल्ड ट्रम्प हे सुरुवातीला अहमदाबादला जाणार आहेत. त्यानंतर ते ताजमहल पाहण्यासाठी आग्रा येथे जाणार आहेत.
दरम्यान, मोदींचा अमेरिकेत ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम झाला होता. तसाच अहमदाबादमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
ठाकरे सरकारकडून कौतुक करावं असं काम झालेलं नाही- पंकजा मुंडे
ठाकरे सरकार येत्या 11 दिवसांत कोसळेल; नारायण राणेंच भाकित
‘या’ दोन गोष्टींसाठी देवेंद्र फडणवीसांनी केलं मुख्यमंत्र्यांच अभिनंदन
पीएचडी करण्यासाठी मी विद्यार्थी म्हणून 10-12 वर्ष अभ्यास करण्यास तयार- चंद्रकांत पाटील