मुंबई : सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचं सावट महाराष्ट्रावर असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर आज गावोगावी तिरड्या उठल्या असत्या, अशी टीका राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास होऊन वीडीयो कॉन्फ़्रेन्सच्या माध्यमातून माहीती घेईपर्यन्त महाराष्ट्रात गावोगावी तिरड्या उठल्या असत्या, असं ट्वीट करत सुरज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
त्यांचा अभ्यास होऊन वीडीयो कॉन्फ़्रेन्सच्या माध्यमातून माहीती घेईपर्यन्त महाराष्ट्रात गावोगावी तिरड्या उठल्या असत्या. https://t.co/BOsRIVRIOo
— Suraj Chavan (@surajvchavan) March 19, 2020
सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे, असं ट्वीट भाजप नेते निरंजन डावखरे यांनी केलं आहे. त्यांच्या याच टीकेला सुरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राज्य सरकार करोनाशी सामना करतंय, तर देवेंद्र फडणवीसंचे समर्थकांनी राजकारण
संसर्ग कमी करण्यासाठी राज ठाकरेंनी सुचवले ‘हे’ उपाय
“हा शिवरायांचा लढणारा महाराष्ट्र आहे, या संकटावर मात केल्या शिवाय राहणार नाही”
घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही : मुख्यमंत्री लाईव्ह