देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर महाराष्ट्राला फायदाच- एकनाथ खडसे

0
354

नवी दिल्ली :  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री म्हणून जाणार असल्याच्या सुरू आहेत. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

दिल्लीमध्ये येणं किंवा न येणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीवर नाहीये… वरिष्ठांनी ठरवलं तर ते दिल्लीला जाऊ शकतात पण जर ते दिल्लीला गेले तर महाराष्ट्राला फायदाच आहे, असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे.

दिल्ली विधानसभेसाठी येत्या 8 तारखेला मतदान होणार आहे. दिल्लीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातले प्रमुख भाजप नेते दिल्लीला गेले आहेत. यामध्ये खडसेही दिल्लीला प्रचाराला गेले आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला, भाजपसाठी दिल्लीत चांगले दिवस आहेत, असं खडसेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

काहीच न मिळाल्याने चित्रा वाघ यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे- रुपाली चाकणकर

सतत लोकांना सल्ले देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना आमचा प्रेमाचा सल्ला- काँग्रेसचा पलटवार

“महिलांवरील अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्रात सहन केले जाणार नाहीत”

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात अमोल कोल्हेंनी दिलं स्पष्टीकरण; म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here