मुंबई : काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढेल, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं. यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
सगळेच स्वबळावर लढत असतील तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्राच्या हिताचा विचार करुन एकत्र लढावं लागेल, असं सामनात म्हटलं. आता यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांच्या सुरात सुर मिसळला आहे.
महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र राहण्यास सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. मात्र, काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील. सामनाने तसं मत व्यक्त केलं आहे आणि महाराष्ट्रातील जनतेची देखील तशीच इच्छा दिसत आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेना-राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र आली तर चमत्कार होईल- संजय राऊत
शिवसेनेला महाराष्ट्रातून संपविल्याशिवाय राहणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे
“राडा करणाऱ्यांना काल शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता शिवभोजन देण्याची वेळ आणू नका”
“एकटा संभाजी काय करणार?; त्याच्या मागे 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी”