आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये बोलताना, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहून, त्यांना भावी सहकारी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. यावरून शिवसेना नेते अब्दुल सत्तार आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना भाजप युतीचे संकेत दिले.
भाजप एकत्र आले तर मतदारांना आनंद होईल असं रावसाहेब दानवे म्हणाले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढचे तीन वर्षे मुख्यमंत्री राहणार असतील तर युतीसाठी आमची तयारी आहे, असं अब्दुल सत्तार यांनी यावेळी म्हटलं. दोघेही औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या अटीवर रावसाहेब दानवे यांनी मात्र स्पष्ट उत्तर देणं टाळलं.
महत्वाच्या घडामोडी –
“कदाचित रावसाहेब दानवेंना शिवसेनेत यायचं असेल”
…म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनातली भावना बोलून दाखविली- देवेंद्र फडणवीस
युतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच भाजपला खुली ऑफर; म्हणाले…