Home महाराष्ट्र केंद्रानं मदत केली नाही, तर औषध साठा जप्त करू- नवाब मलिक

केंद्रानं मदत केली नाही, तर औषध साठा जप्त करू- नवाब मलिक

मुंबई : राज्यात करोनाचे संकट वाढत आहे रूग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शन व लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकार यासाठी वारंवार केंद्राकडे पुरवठ्याची मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

”महाराष्ट्र सरकारने औषध कंपन्यांशी संपर्क साधून मागणी केल्यानंतर, केंद्र सरकारने त्यांना सांगितलं की तुम्ही महाराष्ट्राला औषधी द्यायच्या नाहीत, औषधी दिल्या तर तुमच्यावर कारवाई करू. ही काय परिस्थिती या देशात केंद्र सरकारने निर्माण केली? आम्ही त्यांना सांगू इच्छितो की तत्काळ आपण लोकांचा जीव वाचवण्यासाठी ही जी औषधी आहेत, त्यांना विकण्याची परवानगी द्या, आम्हाला विकण्याची परवानगी द्या, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

तुम्ही हे वाचलात का?

“कोरोनाच्या काळात ‘गरीबांचा मसिहा’ बनलेल्या अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण”

दरम्यान, जर तुम्ही दिलं नाही तर आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आम्ही ही सगळी औषधं जी महाराष्ट्राचा जमिनीवर आहेत, निश्चितरूपाने एफडीएच्या मंत्र्याच्या माध्यमातून तो विभाग सीझ करेल व जनतेला वाटप करण्याचं काम केलं जाईल. याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाह, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“पंतप्रधान मोदींच्या जागी आणखी कोण असतं तर त्याला हिंदू द्रोही ठरवलं असतं”

पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि…; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

“केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण”