भाजपचा आमदार फुटला तर, आश्चर्य वाटू देऊ नका- जयंत पाटील

0
171

पंढरपूर : भाजपचा आमदार फुटला तर, आश्चर्य वाटू देऊ नका, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. ते पंढरपूरमध्ये प्रचारसभेत बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याकडून पैसे आणू असं सांगितलं आहे. योजना पूर्ण करण्याची महाराष्ट्र सरकारमध्ये ताकद आहे, पण हे पैसे तुम्हांला कुणी मागितले, असा खोचक प्रश्न जयंत पाटलांनी यावेळी उपस्थित केला.

तुम्ही हे वाचलात का?

2024 च्या निवडणुकीत काँग्रेस असेल सर्वात मोठा आणि सत्तेतील प्रमुख पक्ष- नाना पटोले

दरम्यान, पंढरपूर– मंगळवेढ्याच्या जनतेची इतकी काळजी होती तर मागच्या 5 वर्षांत कामे का नाही केली? आता भाजपचा आमदार फुटला आणि पुन्हा पोटनिवडणुक घ्यावी लागली तर आश्चर्य वाटू देऊ नका, असं टोला जयंत पाटलांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा बो’ल्ड लुक मधील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ

चंद्रकांत पाटील यांनी कधी शेती केली आहे का?; अजित पवारांचा टोला

ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here