Home महाराष्ट्र “…तर भाजप महाराष्ट्रात दुर्बिण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता”

“…तर भाजप महाराष्ट्रात दुर्बिण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता”

मुंबई : अदर पुनावाला  यांना देण्यात आलेल्या धमकीवरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण रंगलं आहे. त्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.

अदर पूनावाला यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. माणसाचा जीव वाचवण्याचं काम ते करतात, ते ही महाराष्ट्रात. याचा आम्हाला आदर आहे. शिवसेना आक्रमक संघटना असली तरी आम्ही ही भाषा वापरत नाही, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद नसते तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते, असं म्हणत अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

पंढरपूर पोटनिवडणुकीतील विजयानंतर विरोधकांना जर राज्यात सत्तांतर होईल असं वाटत असेल तर बंगाल आणि इतर राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांवरुन केंद्र सरकारनेही राजीनामा दिला पाहिजे. या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारणार का? असा सवालही सावंत यांनी यावेळी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“साताऱ्यात आज रात्रीपासून कडक लाॅकडाऊन”

“भाजपाचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ”

‘त्या’ पक्षाला उघडं करण्याचं काम भाजप करणार; अदर पुनावाला प्रकरणात आशिष शेलारांचा मोठा गाैफ्यस्फोट

बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर पाटील डिस्टर्ब झालेत; वडेट्टीवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला