Home पुणे ठाकरे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असाल तर…; शिवसेनेच्या ‘या’...

ठाकरे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असाल तर…; शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याचा इशारा

पुणे : केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्य सरकारकडून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांनी निवड करण्यात आली आहे. या निवडीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या टिकेवर मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विरोधकांना ठाकरे नावाचीच अ‍ॅलर्जी असल्याने ते टीका करत आहेत. टीका करण्यासाठी विरोधकांकडे भरपूर वेळ आहे. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचा त्यांचा उपक्रम आहे. मात्र, त्यांच्या टिकेकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एखाद्या प्रकरणात त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर त्याला जनता प्रत्युत्तर देईल. ठाकरे कुटुंबीयांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे. काही लोकांकडून स्वतःच अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू आहे. यामुळे सरकारविरोधात टीका करण्याचे काम सुरू असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…नाहीतर 15 ऑगस्टला धनंजय मुंडे यांच्या गाडीखाली जीव देणार

यापुढे रावसाहेब दानवे यांचा जावई असा उल्लेख करू नका, आमचा आता कोणताही संबंध नाही- हर्षवर्धन जाधव

आमच्या सरकारला काहीही धोका नाही, आमचे सगळे पूल भक्कम- संजय राऊत

शरद पवार हे आमचे कुटूंबप्रमुख, त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाला सूचना देण्याचा त्यांना अधिकार- जयंत पाटील