आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जालना : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर भष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर सोमय्यांचा बोलवता धनी कोण हे मला माहित असल्याचे म्हणत अर्जुन खोतकरांनी भाजप नेते रावसाहेब दानवेंकडे इशारा केला आहे. त्यावर आता रावसाहेब दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : भाजपा नेत्यांच्या बेनामी संपत्तीचे पुरावे विधानसभेत सादर करणार; नवाब मलिकांचा गैाप्यस्फोट
कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवावा, असं खुलं आवाहन रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकरांना दिलं आहे. ते जालना शहरातील विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
मी गरीब माणूस आहे, माझ्या नावाने बोंबा मारुन काही फायदा होणार नाही. ज्या गावात मतदान बुथ नव्हते, त्या गावचा मी आज केंद्रात मंत्री आहे. मी कोणावर कशाचाही आरोप केलेला नाही, माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. आणि कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार उघड करावा, असं खुलं आव्हान दानवेंनी दिलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेचं ठरलं; जळगावमधील आगामी निवडणुका तिन्ही पक्ष एकत्रित लढणार
“लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे; एखाद्या लेखकाने लिहिलेलं मान्य नसेल तर शाईफेक करणे निंदनीय”
भाजपाकडून शिवसेनेला खिंडार; शिवसेना नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश