Home देश “अमित शहा संसदेत आले आणि निवेदन दिलं, तर मी टक्कल करेन आणि...

“अमित शहा संसदेत आले आणि निवेदन दिलं, तर मी टक्कल करेन आणि तुमच्या कार्यक्रमात येईन”

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेगॅससच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ पहायला मिळतोय. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून संसदेचं कामकाज ठप्प पडलं आहे. यावर आता तृणमुल काँग्रेसचे खासदार देरेक ओब्रायन यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

मी केंद्रीय गृहमंत्र्यांना संसदेत बघितलं नाही. एका 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. मग गृहमंत्र्यांनी संसदेत उत्तर द्यायला नको का?, असा प्रश्न देवेक ओब्रायन यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच देवेक ओब्रायन यांनी यावेळी थेट अमित शहांना आवाहन दिलं.

बुधवारी जर अमित शहा संसदेत आले आणि निवेदन दिलं. तर मी टक्कल करेल आणि तुमच्या कार्यक्रमात येईल, असं आव्हान देरेक ओब्रायन यांनी अमित शहांना यावेळी दिलं. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

दरम्यान, विरोधकांची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला संसदेत चर्चा हवी आहे. कृषी कायदे, रोजगार-महागाई आणि राष्ट्रीय सुरक्षाच्या (पेगॅसस) या 3 मुदद्यांवर आम्हाला चर्चा हवी आहे. यात सर्वात आधी राष्ट्रीय सुरक्षाच्या मुद्द्यावर सरकारने चर्चा करावी, अशी मागणी ओब्रायन यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण…; प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा

“पुण्यातील टिळक चाैकात मद्यधुंद तरूणीचा धिंगाणा, रस्त्यावर झोपून गाड्या अडविण्याचा प्रयत्न; पहा व्हिडिओ”

पूरग्रस्तांसाठी जाहीर पॅकेज मध्ये शेतकऱ्यांसाठी मदत दिसत नाही- देवेंद्र फडणवीस

“राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात शंका नाही”