Home महाराष्ट्र “अजित पवारांना जर मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे”

“अजित पवारांना जर मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे”

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची 20 जानेवारीला बैठक झाली होती. त्या बैठकीला मंत्र्यांच्या गैरहजेरीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील मंत्री कॅबिनेट विषयी गंभीर नाहीत, असं गिरीश महाजन म्हणाले. तसेच अजित पवारांना कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे, असं म्हणत गिरीश महाजनांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय, अशी स्थिती राज्य सरकारमध्ये आहे, असं म्हणत गिरीश महाजनांनी सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सीरम इन्सिट्यूटच्या अग्नितांडवात 5 जणांचा मृत्यू- राजेश टोेपे

“आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत”

10 वी, 12 वीची परीक्षा ‘या’ दिवशी होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा

“आपल्या हातून लोकांची सेवा आणखी जास्त घडावी या हेतुने जयंत पाटील असं बोलले असतील”