मुंबई : राम मंदीराच्या मुद्दयावरून मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात पुकारलेल्या मोर्चादरम्यान शिवसैनिकांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला.
मुंबईत शिवसेना भवनासमोर भाजपच्या युवा कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यावर जशास तसे उत्तर दिलं जाईल. झालेल्या हल्याची माहिती नाही. पण भाजपच्या कार्यकर्त्यांवर असा हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम केला जाईल, असा इशारा निलेश राणेंनी यावेळी दिला.
खरं म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून किंबहुना शिवसेना ज्या पद्धतीने पोलिसांना समोर ठेवून गुंडागर्दी, दहशतवाद, मारहाण करण्याचा प्रयत्न करतेय, ते दुर्दैवी आहे. सत्तेचं कवच घेऊन अशाप्रकारच्या या गोष्टी महाराष्ट्रात कधीच झाल्या नाहीत., असं निलेश राणे म्हणाले. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.
दरम्यान, आमच्या आंबेकर नावाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारची गुंडागर्दी योग्य नाही. अशा प्रकारचा संघर्ष उभा राहिला तर त्याला वेगळं वळण मिळेल. पोलिसांनी नियंत्रण करायला हवं. पण सरकार आमचं आहे, असं म्हणून पोलिसांसमोर वाटेल ती दादागिरी करणं चुकीचं आहे आणि ते खपवून घेणार नाही, असंही निलेश राणेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेना भवन हे आमचं श्रद्धास्थान, कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार- किशोरी पेडणेकर
बाळासाहेबांना दिलेल्या वचनाचे कारण सांगून…; प्रवीण दरेकरांची शिवसेनेवर टीका
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे?- केशव उपाध्ये
शिवसेनेनं आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली; शिवसेना भवनासमोरील राड्यावरून आशिष शेलारांचा हल्लाबोल