इयाॅन माॅर्गन व पॅट कमिंसची शानदार भागीदारी; कोलकाताचे मुंबई इंडियन्सला 149 धावांचे लक्ष्य

0
185

दुबई : आजच्या आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्स समोर विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

आजच्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात  5 गडी गमावत 148 धावा केल्या. कोलकाताकडून पॅट कमिंसने सर्वाधिक 36 चेंडूत 53 धावा केल्या. तर इयाॅन माॅर्गन 29 चेंडूत 39 धावा, तर शुभमन गिलने 23 चेंडूत 21 धावा केल्या.

दरम्यान, मुंबईकडून राहुल चहरने 2, तर जसप्रित बुमरा, नॅथन कुल्टर नाईल, ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

कोलकाता नाईट रायडर्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय; मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सुरात सुर

…पण खिसे गरम करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?; चित्रा वाघ यांची यशोमती ठाकूरवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here