आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटा बदलून देण्यासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या नोटाबंदीवर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
19 मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेत असताना 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा चालतील, असं सांगण्यात आलं. खरंतर दोन हजार रुपयांच्या नोटा मोठे आर्थिक व्यवहार करणारे लोकांकडे असतात, सर्वसामान्य गरीब लोकांकडे नाहीत. , असं अजित पवार म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.
ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंबद्दल, बोलताना राज ठाकरे भावूक, म्हणाले, आमच्या नात्यात कोणीतरी…
पाचशे आणि हजार रुपयांची नोट पंतप्रधानांनी ज्यादिवशी बंद करण्याचे जाहीर केले, त्याच्या दुसर्या दिवशीच त्या नोटा कागदाचा तुकडा झाला. त्याचपध्दतीने करता आले असते आणि त्यातून काळा पैसा हा चलनामध्ये फिरतोय तो फिरण्यापासून वाचवता आला असता., असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री, मुंबईत येऊन पवारसाहेबांची आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मी सुद्धा उपस्थित राहणार आहे, असंही अजित पवार म्हणाले. तसेच महाविकास आघाडी ही कायम एकजूटीने राहणार आहे. मी तुम्हाला स्टँपपेपरवर लिहून देतो. एक पक्ष असला तरी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. आता जो काही निर्णय होईल तो, या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील आणि त्याची अंमलबजावणी कार्यकर्ते करतील, असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘या’ कारणामुळे वर्ध्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बिनसलं
अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडूण आणू शकले नाहीत; राज ठाकरेंचा टोला
निवडणूकीत देवाला आणलं, तरी पराभव झाला, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा भाजपला टोला