आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका इंग्रजी प्रश्नावरुन विनायक राऊत यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा नारायण राणेंना डिवचलं आहे.
हे ही वाचा : गेली 25 वर्षे त्यांची महापालिकेवर सत्ता आहे, पण…; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल
लोकसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या खात्याअंतर्गत प्रश्न होता. कनीमोझी यांनी तो प्रश्न इंग्रजी भाषेत विचारला होता. लोकसभेत बोलण्याची राणेंची ही पहिलीच वेळ होती. अभ्यास तेवढा झाला की नाही माहिती नाही. त्यामुळे उत्तर देत असताना त्यांनी त्यांच्या पध्दतीने उत्तर दिले. यावर फार काही टीकाटिप्पणी करणार नाही, असं विनायक राऊत म्हणाले
दरम्यान, जेवढा महाराष्ट्र सोपा आहे. तेवढी देशाची संसद सोपी आहे असं कुणी समजू नये. लोकसभेत मलासुध्दा राणेंना प्रश्न विचारता आला असता, पण ते आपलेच गाववाले आहेत. आपण दुर्लक्ष करायला पाहिजे, अशा शब्दात विनायक राऊत यांनी राणेंना टोला लगावला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना मिळणार नोकरी”
…तर भाजप आम्हांला दूर नाही; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला इशारा