आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. तसेच अजूनही हे आंदोलन सूरूच आहे.
हे ही वाचा : “कृषी कायदे मागे घेऊन पंतप्रधान मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवला”
राज्य शासनाकडून हे आंदोलन थांबवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहेत, मात्र एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून संप सुरूच आहे. यानंतर आज एसटी संघटनेचे पदाधिकारी गुजर आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन एसटी कामगारांच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर परब यांनी माध्यमांशी संवाद साधला.
एसटी कामगारांचा संप मिटावा म्हणून एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी मला राज्याच्या महाधिवक्त्याशी चर्चा करायला सांगितलं आहे. मी महाधिवक्त्याशी चर्चा करेन. पण एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन करतानाच विलिनीकरणाची प्रक्रिया एक दोन दिवसात होणारी नाही. समितीचा अहवाल आल्यावरच त्यावर निर्णय घेता येईल, असं परब म्हणाले.
तुम्ही वकील आहात. तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया माहीत आहे. कोर्टाने जी समिती स्थापन केली. तिला पूर्ण अधिकार दिले आहे. अभ्यास करून अहवाल सादर करावा. कोर्टाने निर्णय दिलेले असताना त्यात फेरफार करता येणार नाही. समितीचा जो काही अहवाल असेल त्यावर आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ असं मी त्यांना सांगितलं, असंही परब म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्रात आता शिवसेनेला कुत्रंही भीक घालणार नाही; निलेश राणेंचा घणाघात
ईडीच्या रडारवरील नारायण राणे भाजपमध्ये गेले मग, ते पवित्र झाले का?; शिवसेनेचा सवाल
100 कोटींच्या आरोपांवर शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचं किरीट सोमय्यांना आवाहन, म्हणाले…